Header Ads

सोयाबीनवरील चक्रीभुंगा व स्पोडोप्टेरा अळीकरीता फवारणी करा soybean weevils and spodoptera larvae spray

soyabean


सोयाबीनवरील चक्रीभुंगा व स्पोडोप्टेरा अळीकरीता फवारणी करा

कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना

Spray for soybean weevils and spodoptera larvae

       वाशिम, दि. 03 (जिमाका) : मागील एक महिन्यापासून जिल्हयात सततच्‍या ढगाळ वातावरण व पावसामुळे पिकांची अन्‍नद्रव्‍य घेण्‍याची प्रक्रिया मंदावल्‍यामुळे वाढ समाधानकारक झालेली नाही. अशातच मागील चार दिवसापासुन पावसास उसंत मिळाल्‍यामुळे उष्‍णतेचे प्रमाण देखील वाढले आहे. सोयाबीनवर विविध किडींचा प्रादुर्भाव अल्‍प प्रमाणात दिसुन येत आहे. जिल्‍हयामध्‍ये मागील आठवडयात क्रॉपसॅप अंतर्गत घेण्‍यात आलेल्‍या निरीक्षणावरुन मालेगाव तालुक्‍यातील सोनाळा या गावामध्‍ये चक्रीभुंग्‍याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान करण्याच्या पातळीवर आढळुन आला असुन त्यासाठी उपाययोजना (Spray for soybean weevils and spodoptera larvae) करण्‍यासोबतच शेतकऱ्यांना कृषि विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वतीने सल्‍ला देण्‍यात येत आहे.

         सद्यास्थितीत सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा काही ठिकाणी अल्‍प प्रमाणात तंबाखुवरील पाने खाणारी अळी (स्‍पोडोप्‍टेरा) दिसुन येत आहे. त्‍याकरीता योग्‍य वेळी फवारणी करण्‍यासाठी शेतकऱ्यांनी आपल्‍या शेतामध्‍ये कामगंध सापळे लावून निरीक्षणे घेण्‍याबाबतची प्रचार प्रसिध्‍दी चालु आहे. शेतकरी कामगंध सापळयांचा वापर करीत आहेत. कामगंध सापळयामध्‍ये सलग तीन दिवस हिरव्‍या अळीचे पाच पतंग अडकल्‍यास किंवा फुलावर येण्‍यापुर्वी १ ते २ अळी/मिटर ओळीत, फुलावर आल्‍यानंतर १ अळी/मिटर ओळीत आढळुन आल्‍यास शेतकऱ्यांनी पुढील शिफारशीनुसार फवारणी करावी. या अळीचा बंदोबस्‍त करण्‍याकरीता शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

          चक्रीभुंग्या करीता पुढीलप्रमाणे एक संयोजन प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्‍लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ टक्के एस सी  ३ मी.ली., किंवा ट्रेट्रानिलीप्रोल १८.१८ टक्के एस. सी. ५ ते ६ मी.ली., किंवा इमामेक्‍टींग बेझोंऐट १.९ टक्के ई.सी. ८.५ मी.ली., किंवा इथीऑन ५० टक्के इ.सी. ३० मी.ली., किंवा थायक्‍लोप्रीड २१.७ टक्के एस.सी. १५ मी.ली., किंवा थायमिथॉक्‍झाम १२.६ टक्के अधिक लॅमडा साहलोथ्रीन ९.५ टक्के झेड सी. २.५ मी.ली., किंवा क्‍लोरॅनट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लॅमडा साहलोथ्रीन ४.६ टक्के झेड सी. ४ मी.ली व बीटा-साफ्लुथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमॅडाक्‍लोप्रीन १९.८१ टक्के ओ.डी. ७ मी.ली. याप्रमाणे फवारणी करावी.

          तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीकरीता पुढीलप्रमाणे एक संयोजन प्रती 10 लिटर पाण्यात मिळसून फवारणी करावी. स्‍पायनेटोरम ११.७ टक्के एस. सी.  ९ मी.ली., किंवा ट्रेट्रानिलीप्रोल १८.१८ टक्के एस. सी. ५ ते ६ मी.ली., किंवा इमामेक्‍टींग बेझोंऐट १.९ टक्के ई.सी. ८.५ मी.ली., किंवा फ्लुबेन्‍डामाईड ३९.३५ टक्के एस. सी. ३ मी.ली., किंवा फ्लुबेन्‍डामाईड २० टक्के डब्‍लु जी ५ ते ६ ग्रॅम किंवा इन्‍डोक्‍झाकार्ब १५.८ टक्के ई.सी. ७ मी.ली., किंवा नोव्‍हॅल्‍युरॉन ५.२५ टक्के अधिक इन्‍डॉक्‍झाकार्ब ४.५ टक्के एस सी १६.५ ते १७.५ मी.ली. याप्रमाणे वेळोवेळी निरीक्षणे घेऊन शिफारशीनुसार लेबल क्‍लेम औषधीचा वापर करावा. असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.