वाशिम जिल्ह्यात ८ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - Prohibitory order in Washim district till September 8
वाशिम जिल्ह्यात ८ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यात 26 ऑगस्ट रोजी पोळा व 27 ऑगस्ट रोजी पोळा कर उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी श्री गणेश स्थापना होऊन सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ होणार आहे. सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य श्री. विद्यासागरजी महाराज हे शिरपूर (जैन) येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्यास आहे. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या सर्व बाबींचा विचार करता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी 25 ऑगस्टपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे.
हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.
Post a Comment