Header Ads

धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना Margin money scheme for women Dhangar community

Margin money scheme for women

धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना

Margin money yojana for women in Dhangar community

         वाशिम, दि. 10 (जिमाका) : स्टँड अप इंडिया (Stand Up India) योजनेत धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी योजना (Margin money scheme for women in dhangar community) सुरु करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. ही रक्कम सिडबीकडे वर्ग करण्यात आली आहे. सिडबीने या रक्कमेचे सुरक्षा हमी कवच तयार केले आहे. लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल त्याला सिडबी हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील महिलांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत मार्जिन मनी योजना (Margin money yojana) ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रॉन्ट एन्ड सबसिडी १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. 

           या योजनेच्या मार्गदर्शक सूचना ६ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार शासनस्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या आहे. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे.

         या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शतींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त, मारोती वाठ यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.