एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार batch change option to MPSC and BEd CET exams candidates will be given
MPSC आणि BEd CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार
batch change option to MPSC and BEd CET exams candidates will be given
मुंबई, दि. 17 : एमपीएससी (MPSC) आणि बीएड सीईटी परीक्षा (BEd CET exam) एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले. Batch change option to MPSC and BEd CET exams candidates will be given
सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचएमसीटी (BHMCT) या दोन विषयाची परीक्षा दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरित सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेल (email) वर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment