Header Ads

१४ ऑगस्ट रोजी फाळणी दुःखद स्मृती दिवस 14 August - Partition Horrors Remembrance Day

Partition Horrors Remembrance Day


१४ ऑगस्ट रोजी फाळणी दुःखद स्मृती दिवस

 प्रदर्शन कार्यक्रमाकरीता आदर्श कार्यप्रणाली निश्चित - जिल्हा प्रशासन

14 August - Partition Horrors Remembrance Day

        वाशिम दि.१३ (जिमाका) - आपला देश सन १९४७ ला स्वतंत्र झाला.त्यापूर्वी देशाच्या फाळणीमुळे अनेक नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ आली.फाळणीदरम्यान अनेकांना प्राण गमवावे लागले.अनेकांना अत्याचार सहन करावे लागले.फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे,त्यांनी सहन केलेल्या अत्याचाराच्या व दु:खाच्या वेदना आणि संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी दुःखद स्मृती दिन (14 August - Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळण्यात येणार आहे.

            फाळणी स्मृती दिवसानिमित्त या दिवशी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो लोकांवर झालेले अत्याचार,त्यांच्या वेदना तसेच विस्थापित झालेल्या लोकांचे दु:ख लोकांसमोर मांडले जावे ही या मागची संकल्पना आहे.

            फाळणीग्रस्त जनतेच्या वेदनेचे प्रदर्शन करण्यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस (Indian Council of Historical Research, Indira Gandhi National Center for the Arts) यांनी संयुक्तपणे प्रदर्शन भरविलेले आहे.हे प्रदर्शन इंग्रजी व हिंदी मध्ये डिजीटल स्वरूपात https://amritmahotsav.nic.in/partition-horror-remembrance-day.htm संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

            प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकरीता आदर्श कार्यप्रणाली निश्चित केली आहे. सर्व कार्यालय, शाळा यांनी प्रदर्शन संयमाने व गांभीर्याने आयोजीत करावे. अन्य कोणत्याही समुदायाच्या/समाज घटकाच्या अन्य कोणत्याही समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेवून फाळणीची शोकांतिका आणि जनसामान्यांचे दुःख या प्रदर्शनातून प्रकट होईल. याविषयीचे प्रदर्शन आयोजित करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

No comments

Powered by Blogger.