Header Ads

कारंजा नगर परिषद हद्दीतील रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, अन्यथा १५ ऑगस्ट पासून पिरिपाचे तीव्र जनआंदोलन - Karanja Nagar parishad roads are worst



कारंजा नगर परिषद हद्दीतील रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी 

अन्यथा १५ ऑगस्ट पासून  पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन - विलास राऊत

             कारंजा दि २८ - कारंजा नगर परिषद हद्दितील गौतम नगर, शांती नगर, रमाबाई कॉलनी, ताज नगर, लक्ष्मी नगर, गांधी नगर, भारत नगर, कपिलावास्तु नगर, कृष्ण कॉलनी, शिक्षक कॉलनी, वनदेवी नगर, विद्याभारती कॉलनी, प्रोफेसर्स कॉलनी, आश्रम चौक, माळीपूरा, बेंबळपाट ते एकवीरा नगर पुलापर्यंत, झासी राणी चौक या परिसरामध्ये जुन-जुलै २०२२ मध्ये झालेल्या पावसामुळे कारंजा नगर परिषद कार्यक्षेत्रामधील अंतर्गत व मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरीकांना ये-जा करण्याकरीता अत्यंत त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्याची तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करुन जनतेला मुलभूत सोई-सुविधा तात्काळ पुरण्यात याव्यात अन्यथा दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०८.०० वाजतापासून नगर परिषद कार्यालयासमोर पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल या बाबतचे निवेदन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी तहसिलदार, मुख्याधिकारी, कारंजा यांना त्याबाबतचे निवेदन नागरीकांच्या उपस्थितीत देण्यात आले.



याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष यांनी परिसरातील रहिवाशांच्या मागणीस्तव दि.२३/११/२०२० दि. १८/१०/२०२१ रोजी परिसरातील रहिवाशांचे हित लक्षात घेवून मुलभूत सोई-सुविधा पुरविणे बाबत २० महिन्यापूर्वी मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा यांना नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये मुलभूत सोई सुविधेपासून वंचित असलेल्या गौतम नगर, शांती नगर, रमाबाई कॉलनी, ताज नगर, लक्ष्मी नगर, गांधी नगर, भारत नगर, कपिलावास्तु नगर, कृष्ण कॉलनी, शिक्षक कॉलनी, वनदेवी नगर, विद्याभारती कॉलनी, प्रोफेसर्स कॉलनी, आश्रम चौक, माळीपूरा, बेंबळपाट ते एकवीरा नगर पुलापर्यंत, झासी राणी चौक, प्रवासांना एकदा करण्याकरिता रस्त्याची व रस्त्यावर असलेले सांडपाणी वाहून जाण्याकरिता पक्की आली नसल्यामुळे व जुन-जुलै २०२२ मध्ये झालेल्या व सुरु असलेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्याची तसेच कारंजा शहरातील डांबरी रस्त्याच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत व पुढेही अपघात होवून अपघातग्रस्तास अपंगत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील कॉलनीमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज रोजी साथीच्या रोगाचे लागण सुरु असल्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करून व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी.



गौतम नगर, शांती नगर, रमाबाई कॉलनी, ताज नगर, लक्ष्मी नगर, गांधी नगर, भारत नगर, कपिलावास्तु नगर, कृष्ण कॉलनी या परिसरामधील रहिवासी, विद्यार्थी ये-जा करण्याकरीता पक्का रस्ता नसल्यामुळे रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित करणेस्तव २० महिन्यापूर्वी निवेदन दिले होते व त्या दिलेल्या निवेदनानुसार बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता श्री चांदूरकर साहेब व न. प. चे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष मोक्यावर येवून स्थळदर्शक पाहणी करुन रस्त्याचे सविस्तर अंदाजपत्रक सादर करुन रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल असे सांगितले होते. परंतू आजपर्यंत दिलेल्या आश्वाासनानुसार रस्त्याचे बांधकाम सुरु न झाल्यामुळे आजरोजी त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्यावर चिखल झाल्यामुळे रहिवाशांना, विद्यार्थ्यांना ये-जा करते वेळी अपघात होत आहे व पाणी साचल्यामुळे नागरीकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येत असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून आपल्याला शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन तात्काळ रस्त्यावर कठीण मुरुम टाकून च्या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून दिली  तर रहिवाशांना, विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरीता सोईचे होईल. तसेच गौतम नगर जवळील हनुमान मंदिराजवळ रेल्वे क्रॉसिंग जवळील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे चिखल झालेला आहे. त्या ठिकाणी सुध्दा विद्यार्थी, ये-जा करणारे नागरीक अपघात होवून किरकोळ जखमी हेात आहे व पुढेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मातोश्री रमाबाई आंबेडकर कॉलनी - गौतम नगरला जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्यावर सुध्दा मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहत असल्यामुळे ये-जा करण्याकरीता रहिवाशांना अत्यंत त्रास होत आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्याकरीता जे काँक्रीटच्या नाल्याचे बांधकाम सुरु आहे ते अपूर्ण असून तात्काळ पूर्ण करण्यात यावे जेणेकरुन पावसाचे सांडपाणी रस्त्यावर साचून न राहता नालीतून व्यवस्थित वाहून जाईल व नागरीकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येणार नाह, वंडर किड्स हायस्कूल जवळील काँक्रीट नालीचे झालेले बांधकाम  खचलेले आहे त्याची सुद्धा दुरुस्ती करून देण्यात यावी. के. एन. कॉलेज ते नागपूर औरंगाबाद हायवे पर्यंतच्या पोच रस्त्यावर सुध्दा मोठमोठे खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून ये-जा करणार्या  नागरीकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी सुध्दा खड्डे बुजवून देण्यात यावे जेणेकरुन परिसरातील नागरीकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना ये-जा करणे सोईचे होईल.



कारंजा नगर परिषद हद्दीतील मुख्य डांबरी रस्त्यावर झालेल्या व सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यामुळे नागरीकांना अत्यंत त्रास होत आहे. त्यामुळे सदर नागरीकांना होत असलेला त्रास लक्षात घेता व पुढच्या महिन्यात गणेशोत्सव व इतर सण येत असल्यामुळे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे ते सांडपाणी वाहून जाणारे पाणी सुध्दा रस्त्यावर येवून साचत असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून व सांडपाणी वाहून जाणार्या  नाल्यांची साफसफाई करुन नागरीकांना व कारंजावासियांना न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती. अन्यथा दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०८.०० वाजतापासून नगर परिषद कार्यालयासमोर पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या खात्याची राहील असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रति  जिल्हाधिकारी साहेब, वाशिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा, ठाणेदार साहेब, पो. स्टे. (शहर) कारंजा यांना माहिती व उचित कार्यवाहीकरीता सादर केले आहे.



निवेदन देतेवेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा  कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत, प्रगत मित्र मंडळचे विजय गागरे, चाँदभाई मुन्नीवाले, बबनराव चौधरी, कन्हैयालाल ठाकुर, शिवा कांबळे, संतोष भगत, नामदेव गायकवाड, प्रा. संजय कापसीकर, राज सोनोने, नितीन ताथोड, अनिल गौरखेडे, अँड पंकज सावळे, विष्णू गुळदे, गजानन पंडीत, दिनेश आगासे, बुराण शहा कलंदर शहा, गजाननराव बोरेकर, गोपाल सोनुलकर,मंगेश आगासे, प्रविण बासोळे, चेतन चव्हाण, धीरज इंदोरे, भिमराव मनवर, कैलास सरदार, प्रल्हाद शहाकार, अजहर खा हदीम खा, अमोल कडू, बिरसिंग बावरी, तोतासिंग बावरी, पापासिंग बावरी, बहादूरसिंग बावरी, अरुण गणवीर, रविंद्र गुंजाटे, दिपक मनवर, निलेश लोणारे, अशोक मोरे, गोकुल भुजाडे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरीकांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.