Header Ads

वाशिम जिल्हयात २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत कलम ३७ (१) (३) - In Washim district Section 37 (1) (3) from 26th July to 9th August



वाशिम जिल्हयात २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत कलम ३७ (१) (३)

          वाशिम, दि. 23 (www.jantaparishad.com) : जिल्ह्यात 31 जुलै रोजी मोहरम सणानिमित्ताने सवारी, ताजीये, डोले, पंजे इत्यादीची स्थापना होणार आहे. 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान मोहरम विसर्जन मिरवणूक निघणार आहे. 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्हयात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. 2 ऑगस्ट रोजी हिंदु धर्मींयाचा नागपंचमी हा सण साजरा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य श्री. विद्यासागर महाराज शिरपूर (जैन) येथे चातुर्मास निमित्त वास्तव्यास आहे. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याकरीता मोठया प्रमाणात जैन धर्मीय भाविकांचे जिल्हयात अवागमन राहणार आहे. 

                  उदयपूर आणि अमरावती येथे झालेल्या दोन तरुणांच्या हत्या या सर्व घडामोडींचा विचार करता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे. यासाठी 26 जुलैपासून ते 9 ऑगस्टपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.