Header Ads

वाशिम जिल्ह्यात २५ जुनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश Prohibition order in washim district



वाशिम जिल्ह्यात २५ जुनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

         वाशिम, दि. ११ (जिमाका) : जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील आहे. नजिकच्या काळात शेजारच्या अकोला, अमरावती व यवतमाळ या जिल्हयात घडलेल्या जातीय घटनेच्या प्रतिक्रीया आगामी काळात जिल्हयात उमटून कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत पेट्रोल, डिझेल दरवाढ, एमएसपी कायदा लागू करणे, शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज मंजूरी, दुध दरवाढ, वाढती महागाई, विज बिल माफी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्यासंदर्भात विरोधी पक्षाच्या तसेच शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जातीयदृष्टया आणि सण, उत्सवाच्या दृष्टीने जिल्हा अत्यंत संवेदनशील आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी २५ जुनपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.