Header Ads

कारंजाचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांचे जनतेला आवाहन - appeal by Karanja PI Adharsingh Sonone



 कारंजाचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांचे जनतेला आवाहन 

कारंजा (www.jantaparishad.com) दि.३० - सद्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या पार्श्‍वभुमीवर कारंजा शहरातील सर्व राजकीय पदाधिकारी तसेच नागरिक यांचे कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी सहकार्य करुन शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवणेसाठी आवाहन केले आहे. 

         या आवाहनानुसार कोणतीही व्यक्ती, कोणतेही राजकीय नेते, कोणतेही राजकीय पक्ष यांचेवर जाहिररित्या, सोशल मिडीया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अशी टिप्पणी करु नये जेणेकरुन संबंधीत व्यक्ती, राजकीय नेते, राजकीय पक्ष यांच्या भावना दुखावल्या जाऊन शहरात कायदा व सुव्यववस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. 

          तरी या आवाहनाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आलेला आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पत्राद्वारे कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.