Header Ads

लाभार्थ्यांच्या धान्य वाटपाचे दर व परिमाण जाहीर rashtriy Anna surksha yojna rate and quantity



लाभार्थ्यांच्या धान्य वाटपाचे दर व परिमाण जाहीर

वाशिम,दि.२८ (जिमाका) : लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना २०१३ नुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना,एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी माहे जून २०२२ साठी प्राप्त नियतन धान्याचे परिमाण व दर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिका गहू १८ किलो , तांदुळ प्रति शिधापत्रिका १७ किलो परिमाण असुन गहू प्रति किलो २ रूपये व तांदुळ ३ रूपये किलो असणार आहे.   

       प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी गहू २ किलो व तांदुळ प्रतिलाभार्थी ३ किलो परिमाण असेल. गहू प्रतिकिलो २ रूपये व तांदुळ ३ रूपये किलो असणार आहे.  

       एपीएल (केशरी) शिधापत्रिका शेतकरी असलेल्या लाभार्थ्यांसाठी गहू प्रति लाभार्थी ४ किलो व तांदुळ प्रति लाभार्थी १ किलो परिमाण आहे. दर गहू प्रतिकिलो २ रूपये व तांदुळ ३ रूपये किलो राहणार आहे. 

      प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय योजनेतील प्रत्येक लाभार्थी १ किलो गहु, ४ किलो तांदुळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. व प्राधान्य कुटूंब योजनेतील प्रतिलाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.