Header Ads

कारंजा येथे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वतीने पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे २० मार्च रोजी आयोजन Journalist training workshops in Karanja lad bahujan patrakar sangh



कारंजा येथे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वतीने पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे २० मार्च रोजी आयोजन

पत्रकार कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन

कारंजा लाड दि.१४ (www.jantaparishad.com) - स्थानिक गुरुदेव सेवा समिती शांतीनगर कारंजा येथे होणाऱ्या पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेला विभागातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र बहुजन पत्रकार कारंजे च्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आवारे तसेच ज्येष्ठ पत्रकार एड.सुधाकर खुमकर व दैनिक पुण्यनगरीचे अकोला जिल्हा प्रतिनिधी अनिल माहुरे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून विभागीय अधिकारी राहुल जाधव यांची उपस्थिती राहणार आहे . ही कार्यशाळा 20 मार्चला होणार असून त्याची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे.

सकाळी 10 वा.नोंदणी,नाश्ता

सकाळी 11ते 12  उदघाटन सत्र

विषय १ - बातमीचे तंत्र वेळ : 12 ते 1:30

वक्ते - पुरुषोत्तम आवारे पाटील

1: 30 ते 2 भोजन 

विषय ३ - क्राईम वेळ : 2 ते 3  
वक्ते - ऍड.सुधाकर खुमकर

विषय ३ - आजच्या पत्रकारितेची आव्हाने  वेळ :  3 ते 4 

वक्ते -पुरुषोत्तम आवारे पाटील 

या कार्यशाळेत पत्रकारांचे विविध विषयावर मार्गदर्शन होणार असून या कार्यशाळेत नव्याने पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना करावा  लागणारा संघर्ष समजून पत्रकारांसाठी असणारा संरक्षण कायदा यावर  देखील मार्गदर्शन होणारं आहे. 

तरी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांनी या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा प्रभारी बंडूभाऊ इंगोले, तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे, उपाध्यक्ष एकनाथ पवार, सचीव गणेश बागडे यांचेसह तालुका कार्यकारणी महाराष्ट्र बहुजन  पत्रकार संघ कारंजा यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.