Header Ads

होळी शांततेत आणि शिस्तित साजरी करा अन्यथा कारवाई होणार - वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक. Celebrate Holi in peace and discipline



होळी शांततेत आणि शिस्तित साजरी करा अन्यथा कारवाई होणार   

वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा इशारा

वाशिम दि. 16 - जिल्हयात दिनांक 17.03.2022 रोजी होळी आणि दिनांक 18.03.2022 रोजी रंगपंचमी सर्वत्र साजरी होणार आहे. होळी दरम्यान ठिकठिकाणी लोक उत्साहात एकमेकांवर रंग उधळतात. सार्वजनिक होळी पेटविण्याचे ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. चराउ रानमाळ असलेल्या भागात होळी पेटवितांना योग्य ती खबरदारी घ्यावी.

होळी दरम्यान मदयपान करुन वाहन चालविणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. होळी साजरी करण्यासाठी जबरदस्तीने वर्गणी करणान्या इसमांवर कारवाई करण्यात येईल, होळी आणि रंगपंचमी साजरी करतांना कोणीही डी जे वाजवु नये तसेच रात्री 10 च्या आतच होळी उत्सव साजरा करावा. उत्सव साजरा करतांना होणाऱ्या गर्दीत महीलांनी दागिन्यांची/आभुषणांची काळजी घ्यावी, उत्सव दरम्यान महिलांच्या अंगावर रंग/पाणी फेकणे, छेडछाडाविनयभंग करणे, रंगाचे/ पाण्याचे फुगे मारणे, विहित मर्यादेपेक्षा अति उच्च आवाजात ध्वनी क्षेपकांचा वापर करणे, मशिदीवर गुलाल/रंग उधळणे, जातीवाचक घोषणा देणे, होळीसाठी लाकडे चोरुन नेणे इत्यादी प्रकार निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

होळी आणि रंगपंचमी उत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी कोविड - 19 संदर्भातील शासनाचे निर्देशांचे पुर्णपणे पालन करावे. गर्दी करु नये तसेच मास्क व सॅनीटाझर चा वापर करावा. सध्या इयत्ता 10 आणि 12 वी च्या परीक्षा चालु असल्याने विदयार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय होणार नाही या करीता लाउड स्पिकर लावु नये.

जिल्हयात होळी, रंगपंचमी उत्सव शांततेत साजरा व्हावा या करीता होळी, रंगपंचमी दरम्यान यापुर्वी दाखल असलेल्या गुन्हयांतील आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. होळी, रंगपंचमी बंदोबस्त करीता संपुर्ण जिल्हयात 91 अधिकारी, 1200 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड, 01 SRPF प्लाटुन इतका बंदोबस्त वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पुरविण्यात येत आहे. सर्वांनी शांततेत होळी साजरी करावी असे आवाहन केले  आहे.

तसेच सर्व नागरीकांना वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे होळी च्या हार्दीक शुभेच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.