राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शनिवारी वाशीम जिल्ह्यात. Governor Bhagat Singh Koshyari on Saturday in Washim district
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शनिवारी जिल्ह्यात
भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ व गुरुमंदिरात घेणार दर्शन
वाशिम दि.०३ (जिमाका) - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शनिवार ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथून मोटारीने मालेगाव तालुक्यातील शिरपूर (जैन) कडे प्रयाण.सकाळी १०.१५ वाजता शिरपुर(जैन) येथे आगमन व जैन मंदिराला भेट व दर्शन.सकाळी १०.४५ वाजता शिरपूर( जैन) येथून वाशिमकडे प्रयाण.सकाळी ११.१५ वाजता शासकीय विश्रामगृह,वाशिम येथे आगमन व अधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह येथून कारंजा( लाड ) कडे प्रयाण. दुपारी ३.१० वाजता शासकीय विश्रामगृह कारंजा येथे आगमन व तेथून गुरुमंदिरकडे प्रयाण.दुपारी ३.१५ वाजता गुरुमंदिर येथे आगमन व दर्शन. दुपारी ३.४५ वाजता गुरुमंदिर येथून मोटारीने अमरावतीकडे प्रयाण करतील.
Post a Comment