Header Ads

वाशिम जिल्ह्यातील इयत्ता १ ते ८ चे शाळेमध्ये घेण्यात येणारे (ऑफ लाईन) वर्ग ३१ जानेवारी पर्यन्त पुर्णपणे बंद - Washim District DM order - schools will be closed till 31 jan for 1 to 8th class



वाशिम जिल्ह्यातील इयत्ता १ ते ८ चे शाळेमध्ये घेण्यात येणारे (ऑफ लाईन) वर्ग ३१ जानेवारी पर्यन्त पुर्णपणे बंद 

मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा 

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांचे आदेश 

     वाशिम दि 07 (www.jantaparishad.com) -   वाशिम जिल्हातील इयत्ता १ ते ८ पर्यंतचे वर्ग ३१ जानेवारी २०२२ पर्यन्त बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यानी आज एका आदेशानुसार दिले आहेत.

    या संदर्भातील पूर्ण आदेश हे पुढील प्रमाणे आहेत.  

    राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग कायदा - 1897 दि 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीची अंमलबजावणी साठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे व त्याबाबतची नियमावली प्रसिध्द करुन जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषीत केले आहे:

    संदर्भाय 16 अन्वये मा. मख्य सचिव, महसुल व बन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभाग, मंत्रालय यांनी कोविड-10 च्या प्रकारापैकी एक असलेल्या ओमिक्रांन विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता अतिरिक्त निर्बंध लागू करण्याबाबत सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार संदर्भीय क्रमांक 17 अन्वये आदेश पारीत करण्यात आले आहे.

    संदर्भीय  क्रमाक 18 अन्वये अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ व तत्सम शेक्षणिक सस्थांमधील वर्ग ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत.

    कोविड-19 विषाणुच्या प्रकारापेको एक असलेल्या ओमीक्रॉन  विषाणुच्या वाढत्या प्रभावाने रोजच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दैनंदिन अहवालावरुन निर्देशनास येत आहे. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांनी  प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तसेच साथ रोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संपुर्ण वाशिम जिल्हगामध्ये कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंध करण्याकरीता वाशिम जिल्हयातीन शहरी व ग्रामीण क्षेत्रामध्ये असणा-या इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 पर्यंत सर्व प्रकारच्या शासकीय / निमशासकीय व खाजगी शाळा (प्रार्थामक व माध्यमिक) तसेच अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व तत्सम शैक्षणिक संस्था बंद करण्यात येत आहे.

1) वाशिम जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील असणा-या सर्व प्रकारच्या शासकीय/ निमशासकीय व खाजगी शाळेतील इयत्ता । ते 8 वी चे वर्ग विद्यार्थ्यांसाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्यक्ष अध्ययन पध्दतान ( ऑफ लाईन) बंद करुन पुर्णपणे ऑनलाईन पध्दतीने सुरु ठेवण्यास तसेच इयत्ता 9 वो ने 12 वो पर्यतचे वर्ग कोविड-19 च्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन शाळेमध्ये प्रत्यक्ष अध्ययन कार्यसुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. कोविड-19 च्या अनुषंगान परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबत दिनांक 31 जानेवारी 2022 नंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील. इयत्ता ते ४ वी चे शाळेमध्ये घेण्यात येणारे (ऑफ लाईन) वर्ग पुर्णपणे बंद राहतील मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा राहोल तसंच इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील.

2) अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व तत्सम शेक्षणिक संस्था दिनांक 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत बंद राहतील. सदर विद्यालयातील वर्ग ऑन लाईन पद्धतीने सुरु राहतील 

3) वेळोवळी निर्गमित करण्यात आलेले आदेश / मार्गदर्शक सुचना व त्यानुसार लागू असणारे प्रतिबंधात्मक आदेश व उपाययोजना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

4) उक्त आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता-1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानणत येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल अशा व्यक्ती, संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाव्दारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.

5)  तंत्रनिकेतनामधील विद्यार्थी 15 ते 18 या वयोगटातील असल्याने व या वयोगटातील व्यक्तीचे लसोकरण सुरु झाले असल्याने संचालक (तंत्र शिक्षण) यांनी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणांना उपलब्ध करुन दयावी व विशेष मोहिमेन्दारे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.

6)  ज्या शिक्षकीय/शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचा तपशिल जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करुन देऊन व स्थानिक प्राधिकरणाशी संपर्क साधुन विशेष मोहिम राबवून लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.

7)  सार्वजनीक विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयीन शिक्षकीय/शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती 50% करण्यात येऊन चक्राकार पध्दतीने त्यांच्या कार्यालयीन उपस्थितीबाबत व वर्क फ्रॉम होम बाबत विद्यापीठाने नियोजन करावे.

8) वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश / मार्गदर्शक सुचना व त्यानुसार लागू असणारे प्रतिबंधात्मक आदेश व उपाययोजना पुढील आदेशापर्यंत लागु राहतील.

9)  उक्त आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता-1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानणत येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल अशा व्यक्ती, संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमो नाही अशा अधिका-यास या आदेशाव्दारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.

    उक्त आदेश हे दिनांक 07/01/2022 रोजी पासुन संपुर्ण वाशिम जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागाकरीता लागु राहील. असे देश आज दिनांक 07/01/2022 रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी निर्गमित केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.