Header Ads

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन - blood donation camp



परिवर्तन बहुउद्देशीय संस्था व माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था यांचे संयुक्त विद्यमाने

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कारंजा दि १२ - रक्ताची गरज जगभरात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात किमान एकदा रक्तदान करणे आवश्यक आहे, विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होते. 



याच धर्तीवर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तसेच भारतीय सेना दिनाचे औचित्य साधून परिवर्तन बहुउद्देशीय संस्था कारंजा (लाड) जिल्हा वाशिम तथा माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था कारंजा (लाड) जिल्हा वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने स्थानिक कामक्षा देवी संस्थान सभागृह कारंजा शहर पोलीस स्टेशन समोर येथे शनिवार दिनांक 15/ 1/ 22 रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

 तरी सदर शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी हजेरी लावून सदर शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज रोकडे यांनी केले आहे.सदर रक्तदान शिबिरात येणाऱ्या रक्तदात्यांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याने मास्कचा वापर करावा. सेनेटायजर ची व्यवस्था शिबिराचे ठिकाणी केलेली आहे.

No comments

Powered by Blogger.