Header Ads

कोरोना संसर्गाबाबत खबरदारी पाळा तसेच शासकीय आदेशाचे पालन करा - वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन - Appeal by Washim District Police Force to the public

कोरोना संसर्गाबाबत खबरदारी पाळा तसेच शासकीय आदेशाचे पालन करा  वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन

विनामास्क फिरणाऱ्या एकुण 30 लोकांवर दंडात्मक कारवाई 
02 लोकांवर कलम 188 भा.द.वि. नुसार गुन्हे दाखल




वाशिम (www.jantaparishad.com) दि ०९  - मागील दोन वर्षा पासुन सुरु असलेल्या कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमिवर गेल्या काही दिवसामध्ये ओमिक्रॉन ही नविन विषाणु प्रजाती आढळुन आल्याने संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. तरी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच शासनाच्या आदेशांचे यथोचित पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. 

ओमिक्रॉन या विषाणु प्रजातीस प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 08.01.2022 पासुन नविन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार ---

01.सकाळी 05.00 ते रात्री 11.00 वाजता दरम्यान 05 किंवा जास्त व्यक्तींना विनाकरण फिरण्यास मनाई आहे.

02.रात्री 11.00 वा ते सकाळी 05.00 वाजता दरम्यान संचारबंदी करण्यात येत आहे.

03. लग्न समारंभ तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोक सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

04.शाळा, कॉलेज दिनांक 15.02.2022 पावेतो बंद करण्यात येत आहेत.

05. पार्क, म्युझियम, किल्ले इत्यादी ठिकाणे बंद करण्यात येत आहे.

06.शॉपींग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट, सीनेमा थेटर इत्यादी यामध्ये फक्त 50 टक्के क्षमतेत परवानगी राहील तसेच त्याकरीता पुर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

तसेच इतर अनेक निर्बंध लागु करण्यात येत आहे. अदयापपावेतो जिल्हयात एकुण 68 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. ओमिक्रॉन या विषाणु प्रजातीस प्रतिबंध करण्यासाठी वाशिम पोलीसांनी जिल्हा सीमा हददीवर एकुण 12 ठिकाणी नाकाबंदी नेमली असुन कोव्हिड 19 च्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर कोव्हिड निबंध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे करीता स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहेत. रात्री दरम्यान नाकाबंदी, रात्रगस्त च्या माध्यमातुन विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. काल दिनांक 08.01.2022 रोजी विनामास्क फिरणान्या एकुण 30 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 02 लोकांवर कलम 188 भा.द.वि. नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोव्हिड 19 चा संसर्ग वाढत असुन आपण सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यायची आहे. शासनाच्या आदेशांचे यथोचित पालन करुन सहकार्य करावे असे वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.