Header Ads

लसीकरण केलेल्यांनाच करता येणार प्रवास vaccination mandatory for traveling



लसीकरण केलेल्यांनाच करता येणार प्रवास

कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण आवश्यक

वाशिम, दि. 01 (जिमाका) : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने रुग्णसंख्येत देखील घट होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनी केलेल्या अथक परिश्रमातून कोरोना संसर्गाला प्रतिबंध करणारी लस विकसित केली. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखायची असेल तर कोविड प्रतिबंधक लस घेणे हा एकमेव उपाय आहे. कोविड - 19 विषाणूच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी 27 नोव्हेंबर 2021 च्या मुख्य सचिवांच्या एका आदेशाद्वारे सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन विषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड -19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार शर्तीच्या अधीन राहून खुले करण्यात येत आहे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण केले असेल तर त्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

खासगी परिवहन सेवा यांच्यासाठी तसेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे लसीकरण झालेले असावे. राज्यात सर्व देशांतर्गत प्रवाशांचे लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.   

कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती जसे की खेळाडू,अभिनेते, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे लसीकरण केलेले असावे. दुकाने, मॉल, आस्थापना, समारंभ व संमेलन आदी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींकडूनच व्यवस्थापन केले जावे. अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत व ग्राहक यांचे देखील लसीकरण झालेले असावे.

चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय व सभागृह इत्यादी बंदिस्त/ बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या/उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना तर संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनासाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशा व्यक्तीला संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती समजण्यात येईल. असे आदेशात नमूद केले आहे.

No comments

Powered by Blogger.