कोरोना व ओमिक्रॉनपासून संरक्षणासाठी लस घेतलेल्यांचाच कार्यक्रमात सहभाग entry in programs to vaccinated only
कोरोना व ओमिक्रॉनपासून संरक्षणासाठी लस घेतलेल्यांचाच कार्यक्रमात सहभाग
वाशिम, दि. 10 (जिमाका) : राज्यात कोरोना विषाणूचा आणि ओमिक्रॉनचा प्रसार सद्यस्थितीत सुरुच आहे. जिल्हयात खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयातील विविध कार्यालयामध्ये कोरोना विषाणूचा आणि ओमिक्रॉनचा प्रसार होवू नये तसेच जिल्हयातील अधिकारी/कर्मचारी व सामान्य नागरीक यांना त्याचा संसर्ग होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हयात ओमिक्रॉन या कोविड विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने जिल्हयातील अधिकारी/कर्मचारी व सामान्य नागरीक यांना जिल्हयामध्ये ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अशा सर्व ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असल्याबाबतची खात्री झाल्यानंतर व्यक्तींना या आयोजनामध्ये सहभागी होता येईल. तसेच ज्या व्यक्तीचे लसीकरण झालेले नाही, अशा व्यक्तींना या आयोजनामध्ये सहभागी होता येणार नाही. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.
Post a Comment