Header Ads

"दृष्टी" चा शुभारंभ सोहळा संपन्न - "Drishti" All inclusive police patrol system



वाशिम जिल्हयात पोलीस दलात सर्व समावेशक पोलीस गस्त प्रणाली अतर्गत 

"दृष्टी" चा शुभारंभ सोहळा संपन्न

वाशिम दि.09 - जिल्हयात मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध करणे व महीलांची छेडखानी घटनांना आळा घालणे, सतत पोलीस व लोकांमध्ये पोलीसांबद्दल विश्वास निर्माण करणे या करीता मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिह यांचे संकल्पनेतुन वाशिम जिल्हयात प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील बस स्टॅड, मेन मार्केट लाईन, सराफा बाजार, पुतळे, मंदीर, मश्जित शहरातील प्रत्येक चौकात, शाळा, कॉलेज मिश्र वस्तीत व प्रत्येक पो.स्टे. मधील संवेदनशिल ठिकाण याकरीता पोलीस व जनता यामध्ये सतत पोलीस अस्तीत्व राहावे याकरीता क्युआर कोड व जिपीएस सर्व समावेशक पोलीस गस्त प्रणाली “दृष्टी” हे कार्यान्वीत करण्यात येत आहे.यापुर्वी वाशिम जिल्हयात १३ पोलीस स्टेशन अंतर्गत ४४० क्युआर कोड बसविण्यात आले होते

पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिह यांनी परीनामकारक गस्त व सतत जनतेमध्ये पोलीसांचे अस्तीत्व दिसावे याकरीता क्युआर कोड चे संख्येत वाढ करुन ती संख्या आता ३७०० झाली आहे. यामध्ये सदर क्युआर कोड गुडमॉर्निग पेट्रोलींग दरम्यान सकाळी ०५ ते ०७ पावेतो, सायंकाळी ०५.३० ते ०९.३० पावेतो पायी पेट्रोलींग, रात्रगस्त २३ ते ०५ पावेतो, त्याच प्रमाणे ०८ ते २० व २० ते ०८ या वेळेत बिट मार्शल पेट्रोलोंग व पेट्रोलींग मोबाईल, निर्भया पथक, वाहतूक शाखा यांचेकडुन पेट्रोलींग दरम्यान क्यआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करण्यात येतात वाशिम जिल्हयातील ९१ अधिकारी आणि ९०४ पोलीस अंमलदार यांनी ई पोलीस अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड केले आहे. आता पर्यंत ३९६२ महत्वपूर्ण व संवेदनशिल ठिकाणा पैकी मंदीर- १११५, मश्जिद - १७० , पुतळे-९२०, शाळा व कलेज- २२५, बँक व वित्तीय आस्थापना-१६० एटीएम –२५, ज्वेलर्स - २२५, शासकीय कार्यालये -११५, मुख्य बाजार पेठ- २५ आणि एकूण गावे – ७१६ असे एकूण ३७०० क्यूआर कोड लावण्यात आलेले आहेत.

सदर "दृष्टी" योजनेचे परीक्षण पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिह, अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे, हे करीत असतात. पोलीस अधिक्षक वाशिम यांनी मासीक गुन्हे आढावा बैठक मध्ये कर्तव्यावर प्रभावीपणे चौख पैटोलींग करण्याबाबत वारंवार सुचित केले आहे. सदर प्रणालीचे नियंत्रण हे पोलीस अधिक्षक कार्यालय येथुन करण्यात येत आहे. तसेच पोलीस वाहनांचे आधुनिकीकरण करुन पुर्वी १४ वाहनांना असलेली जिपीएस यंत्रणा वाढवुन ती ७७ वाहनांना करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस वाहनांचे सतत लोकेशन मिळत असुन त्यावर सुध्दा पोलीस अधिक्षक कार्यालयातुन नियंत्रण केले जात आहे. एखादी घटना घडल्यानंतर पोलीस वाहन घटनेच्या ठिकाणी किती वेळेत पोहचले,त्यांना पोहचण्यास लागणार वेळ यावर सुध्दा जिपीएस प्रणाली व्दारे लक्ष ठेवणे सोईस्कर झाले आहे. यापुढे सुध्दा पोलीस व जनतेमधील विश्वास वाढविण्याचे दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात येते आहेत.

No comments

Powered by Blogger.