Header Ads

संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचे हेलीकॉप्टर दुर्घटनेत निधन CDS Bipin Rawat dies in helicopter crash

संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचे हेलीकॉप्टर दुर्घटनेत निधन 

    नवी दिल्ली दि.०८ : आज दुपारी  तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कराच्या काही अधिकार्‍यांसह इतर ११ असे १३ जणांचा मृत्यू झाला. १४ जणांपैकी फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले असून त्यांच्यावर सध्या वेलिंगटन इथल्या लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची  बैठक झाली. या बैठकीत २ मिनिटांचे मौन राखून हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह इतर सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने देशावर मोठा आघात झाला आहे. भारतीय संरक्षण दलासाठी ही कधीही भरून न येणारी हानी असून या दुर्घटनेने सारेच स्तब्ध झाले आहेत. 

भारत मातेच्या या विर सुपुत्राला व या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना साप्ताहिक जनता परिषदचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.  

No comments

Powered by Blogger.