Header Ads

परिवहन विभागाची कारवाई - लस न घेतलेल्या 23 प्रवाशांना दंड - action by RTO - Penalty for 23 passengers not vaccinated


वाशिम दि 04/12/2021  

परिवहन विभागाची कारवाई - लस न घेतलेल्या 23 प्रवाशांना दंड

 64 हजार रुपये दंड आकारला 

वाशिम दि.4 www.jantaparishad.com (जिमाका) - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले असताना काही व्यक्ती लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय,वाशिम यांनी राबविलेल्या मोहिमेतून 23 प्रवासी लस न घेता प्रवास करताना आढळल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून 64 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येऊन 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे लस न घेता वाहतूक करणारे आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

            कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला असताना जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कोविड लसीकरणाची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या 10 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींचे पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

            राज्य शासनाने 27 नोव्हेंबर रोजी एक आदेश काढून सर्व पात्र व्यक्तींना तसेच प्रवास करणाऱ्यांना लस घेणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात काही व्यक्ती लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन एस. यांच्या निदर्शनास आल्याने लस न घेतलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यक्ती,प्रवास करणाऱ्या व्यक्ती तसेच दुचाकी चालक यांना देखील लसीकरणाशिवाय प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.


No comments

Powered by Blogger.