Header Ads

वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर - sudharit paisewari washim district kharip

 




वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर

जिल्ह्याची सुधारित पैसेवारी सरासरी ५४ पैसे
मालेगाव व रिसोड तालुक्याची पैसेवारी ४७ पैसे 

वाशिम दि.१ (जिमाका) - जिल्ह्याच्या सन २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ५४ पैसे इतकी आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे आहेत. त्यापैकी ५७१ गावांची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त तर २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.

      वाशिम तालुक्यात लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या १३१ असून या सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५७ पैसे आहे. मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ४७ पैसे, मंगरुळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ५७ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची पैसेवारी ५९ पैसे आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ५९ पैसे इतकी आढळून आली आहे.

                 मालेगाव आणि रिसोड तालुक्याची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.