अधिकारी व कर्मचा-यांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास नोव्हेंबरचे वेतन मिळणार - no vaccination no payment to government employees
अधिकारी व कर्मचा-यांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास नोव्हेंबरचे वेतन मिळणार
जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस.यांचे जिल्ह्यातील सर्व उपकोषागार अधिका-यांना निर्देश
वाशिम, दि. 10 : ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी औद्योगीक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पुर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 2 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी आस्थापनेतील कर्मचारी,व्यावसायीक, फेरीवाले, रिक्षा, टॅक्सी चालक व इतर कामगार कर्मचारी यांचे तात्काळ लसीकरण पुर्ण करुन घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे.
जिल्हयात कोविड- 19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक असल्याने, कमीत कमी एक मात्रा घेतली असल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच माहे नोव्हेंबर 2021 या महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार आहे.ज्या अधिकारी व कर्मचा-यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा अद्याप घेतलेली नाही,अशा सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन अदा करण्यात येवु नये.असे निर्देश जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस.यांनी जिल्ह्यातील सर्व उपकोषागार अधिका-यांना दिले आहेत.
Post a Comment