Header Ads

पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन - kisan credit card vishesh mohim



पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

 वाशिम,दि.२५ (जिमाका) - केंद्र शासनाने २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या किसान क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता.त्या अनुषंगाने राज्यातील दुध/ सोसायटी/दुध संघ/ दुध उत्पादक कंपनीच्या सभासद असलेल्या दुध उत्पादक शेतकरी व पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ देणेसाठी १५ नोव्हेंबर २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विशेष माहिम हाती घेतली आहे. तरी त्या अनुषंगाने सर्व पात्र पशुपालक शेतकऱ्यांना पुनश्च किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड मोहिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर आयोजीत करण्यात येणार आहे.

तरी योजनेच्या मार्गदर्शक सुचना, योजनेसंदर्भात वांरवार उपस्थित होणारी प्रश्नोत्तर, योजनेसाठी ऑफलाईन पध्दतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घेवून इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती तसेच बचत गटातील महिलांना लाभ मिळवून देण्याकरीता तालुका अभियान व्यवस्थापक यांची नेमणुक करण्यात आली आहे. वाशिम येथे २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती डॉ.शाम गाभणे,पशुसंवर्धन विषय समिती सदस्य व लिड बँकचे व्यवस्थापक श्री. निनावकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक सुधीर खुजे व सर्व तालुक्याचे नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी जि.प.उपाध्यक्ष श्री. गाभणे व डॉ. विनोद वानखडे, यांनी सर्व नोडल अधिकारी यांना तालुकास्तरावर बॅॅंकेसोबत समन्वय साधून किसान क्रेडीट कार्ड पशुपालक यांचे शिबीर आयोजित करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धनाकरीता व्यवस्थापन खर्चासाठी योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत आदेशीत केले आहे.

No comments

Powered by Blogger.