Header Ads

प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागाकडे करणे आवश्यक - Every TB patient must be registered with the health department


Every TB patient must be registered with the health department

प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागाकडे करणे आवश्यक 

अन्यथा संबंधित प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषधी विक्रेते यांचेवर कार्यवाही 

क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना  करणे हा उद्देश

वाशिम,दि.11(जिमाका) - जिल्ह्यातील क्षयरुग्णांवर उपचार करणा-या खाजगी रुग्णालय, खाजगी औषधी विक्रेते, प्रयोगशाळा यासारख्या संस्थांना क्षयरुग्णांची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे,नियमीत उपचारास प्रतिसाद न देणा-या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना  करणे हा उद्देश आहे. त्यामुळे अशा रुग्णांची नोंद करणे अनिवार्य आहे. खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांनी क्षयरोग निदान करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडीओलॉजी सुवि‍धा क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथीची सर्व रुग्णालये ,डॉक्टर्स  (सर्व बाह्यरूग्ण व आंतररूग्ण सुविधा) आणि‍ क्षयरोगाची औषधी विकणारे सर्व औषधी विक्रेते यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे क्षयरुग्णांची नोंद करणे आवश्यक आहे.

       ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषधी विक्रेते रूग्णांची नोंदणी करणार नाही अशा संस्था व व्यक्तीना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येऊन भारतीय दंड विधान कलम 269,270 नुसार कार्यवाहीसाठी पात्र असतील. या कलमांतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतुद आहे.जिल्ह्यातील क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व प्रयोगशाळा , रुग्णालयावर उपचार करणारे विविध पॅथीची सर्व रुग्णालये ,डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधी विकणारे सर्व औषधी विक्रेते यांना 1 जानेवारी 2021 पासून निदान होणा-या, उपचार घेणा-या,औषधी घेणा-या सर्व रुग्णांची नोंदणी जिल्हा क्षयरोग कार्यालयास करावी.क्षयरूग्ण नोंदणीसाठीच्या विहीत नमुन्यातील माहिती जिल्हा क्षयरोग कार्यालय वाशिम यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा dtomhwsm@rntco.org या ईमेलवर दरमहा पाठविण्यात यावी.

         यामध्ये 2 आठवडयाहुन अधिक कालावधीचा खोकला, ताप,वजनात लक्षणीय घट, भुक न लागणे, मानीवर गाठ येणे यापैकी  कोणतेही 1 लक्षण असल्यास संशयीत क्षयरुग्ण समजण्यात यावा. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.