189 ग्रामपंचायत सदस्य निवडणूकीसाठी 118 ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता election for gram panchayat members189 ग्रामपंचायत सदस्य निवडणूकीसाठी 118 ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता

वाशिम दि.23 (जिमाका) - जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायतीमध्ये विविध कारणाने रिक्त झालेल्या 189 ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 118 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून म्हणजे 17 नोव्हेंबरपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजे 27 डिसेंबर 2021 पर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

निवडणूक कार्यक्रम

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

22 नोव्हेंबर 2021 - नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करणे.

 22 नोव्हेंबर 2021- तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत - नामनिर्देशनपत्रे 

मागविण्याचा व सादर करण्याचा दिवस व वेळ. 7 डिसेंबर 2021 सकाळी 11 वाजतापासून छाननी संपेपर्यंत - नामनिर्देशन छाननी करण्याचा दिवस व वेळ. 9 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजतापर्यंत - नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ.9 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजतानंतर - निवडणूक चिन्ह नेमुन देण्याचा आणि अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ. 21 डिसेंबर 2021 सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत - मतदानाचा दिवस . 22 डिसेंबर 2021 - मतमोजणी. 27 डिसेंबर 2021 - निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करणे. अशाप्रकारचा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells