वाशिम जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपर्यंत कलम ३७ चे प्रतिबंधात्मक आदेश लागू - Section 37 restraining order in Washim district till November 11
वाशिम जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपर्यंत कलम ३७ चे प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात 4 ते 6 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी हा सण साजरा केला जाणार आहे. जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असून जिल्ह्यात मागील काळात घडलेल्या जातीय घटनांच्या प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत जिल्हयात कायम असल्याने कोविड-19 प्रतिबंधक उपायाअंतर्गत निर्गमित प्रतिबंधक निर्देशाचे पालन करण्याच्या दृष्टीने निरंतर कार्यवाही करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषि विधेयक, शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज मंजूरी, दूध दरवाढ, वाढती महागाई, वीज बील माफी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्यासंदर्भात विरोधी पक्षाचे तसेच शेतकरी संघटना इत्यादींचे वतीने आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा जातीयदृष्टया आणि सण-उत्सवाचे दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. मागील काळात जिल्ह्यात घडलेल्या जातीय घटनांच्या प्रतिक्रिया आगामी सण उत्सवाचे काळात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे व्हावे याकरीता 28ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजतापासून ते 11 नोव्हेंबर 2021 पर्यत मुंबई पोलीस अधिनियमातील कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.
Post a Comment