कारंजा मध्ये ईद-ए-मिलाद संबंधाने मिरवणुकीचे आयोजन करू नये - ठाणेदार आधारसिंग एस सोनोने no procession for Eid a Milad in Karanja
कारंजा मध्ये ईद-ए-मिलाद संबंधाने मिरवणुकीचे आयोजन करू नये - ठाणेदार आधारसिंग एस सोनोने
कारंजा दि.१८ - पोलीस स्टेशन कारंजा शहर हद्यीमध्ये साजरा होत असलेल्या ईद-ए-मिलाद सणाबाबत सुचना ठाणेदार आधारसिंग एस सोनोने यांनी खालील प्रमाणे दिली आहे.
शहर मध्ये ईद-ए-मिलाद उत्सव समिती कारंजा यानी ईद-ए-मिलाद निमीत्य कारंजा शहरामध्ये मिरवणुकीचे आयोजन केले होते. ईद-ए-मिलाद उत्सवा निमीत्य वाशिम जिल्हया मध्ये कोठेही मिरवणुकीचे आयोजन केलेले नाही.
मा.जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांनी ईद-ए-मिलाद संबंधाने पोलीस प्रशासनाला मिरवणुकीला परवानगी बाबत योग्य ते निर्णय घेण्यात बाबत अधिकार देण्यात आले.
मा. मा.जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांचे आदेशा प्रमाणे व दिलेल्या अधिकाराप्रमाणे ईद--मिलाद संबधाने आयोजकांनी मिरवणुक काढण्याबाबत अर्ज पोलीस स्टेशनला सादरा केला त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कारंजा शहर तर्फे त्यांची परवानगी नाकारण्यात आली आहे. कोणीही कारंजा मध्ये ईद-ए-मिलाद संबंधाने मिरवणुकी आयोजन करू नये. मिरवणुकीचे आयोजन केल्यास व ईद-ए-मिलाद संबंधाने मिरवणुकीला परवानगी मिळाली असे वॉस्टअॅप व्दारे प्रसारित केल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे पोलीस स्टेशन कारंजा शहर जि.वाशिम चे पोलीस निरिक्षक आधारसिंग एस सोनोने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Post a Comment