Header Ads

स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमची कार्यवाही दोन मोटरसायकल चोरास अटक- LCB washim arrested two motorcycle thieves



स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमची कार्यवाही दोन मोटरसायकल चोरास अटक

४,३०,०००/-रुपयाची १४ मोटारसायकली हस्तगत

वाशिम (www.jantaparishad.com) दि 02- दिनांक २०/०९/ २०२१ रोजी फिर्यादी भुषन अजबराव राउत वय ३० वर्ष रा. वनोजा ता. मंगरूळपीर जि. वाशिम यांनी पोस्टे मंगरूळपीर येथे तक्रार नोंदविली की, यातील फिर्यादी ची पॅशन प्रो मो सा. क MH-37/F-8628 ही त्यांचे घरासमोर दि.१५/०९/२१ ते दि.१६/०९/२१ चे २२.३० वा चे सुमारास उभी केलेली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने वरील मो.सा. कि.२५,००० रू ची चोरून नेली. अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे अप क.९६०/२१ कलम ३७९ भादविचा दाखल करण्यात आला.

मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्हयाचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेश देवुन रवाना केले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) विजय अशोक बनसोड वय २५ रा.काटा, ता. जि. वाशिम २) विधीसंघर्ष बालक रा काटा, ता. जि. वाशिम यांना मोटरसायकल गुन्हयाचे संदर्भात सखोल विचारपुस केली असता पॅशन प्रो मो.सा. क MH-37/F-8628 कि २५,०००/- रू ची मोसा तसेच हिंगेली, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळया कंपनीच्या १३ मो. सा. किं. ४,०५,०००/- रू च्या चोरल्याचे कबुल केले व सदर मो.सा. त्यांचे कडुन हस्तगत करून पुढील तपास कामी नमुद आरोपी व मोटारयसायक्ल पोलीस स्टेशन मंगरूळपीर यांच्या ताब्यात दिली.

सदर कारवाईत मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,सपोनि अतुल मोहनकर,प्रमोद इंगळे,विजय जाधव, पोउपनि पठाण, पोना सुनिल पवार,राजेश राठोड,प्रशांत राजगुरू,अमोल इंगेले, पोशि राजेश गिरी, अश्वीन जाधव,दिगंबर मोरे, संतोष शेणकुडे,चालक मिलिंद व संदीप यांनी सहभाग नोंदविला. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन मंगरुळपीर हे करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.