Header Ads

महाडिबीटी पोर्टल : विद्यार्थी शिष्यवृती व अन्य योजनांचे अर्ज 20 ऑक्टोबर पर्यंत पाठवावे - Maha dbt student scholarship

 


महाडिबीटी पोर्टल : विद्यार्थी शिष्यवृती व अन्य योजनांचे अर्ज 20 ऑक्टोबर पर्यंत पाठवावे

 समाज कल्याण विभागाचे आवाहन

वाशिम, दि. 08 (जिमाका) : अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृती/ शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष सन 2020-21 मधील अर्ज स्विकारण्यासाठी 3 डिसेंबर 2020 पासून नवीन प्रवेशित व नुतनीकरणाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे.

सन 2020-21 मध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील बाकी राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 20 डिसेंबर 2021 पर्यंत भरुन घ्यावे. महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची ही अंतिम संधी आहे.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर फार कमी प्रमाणात नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष सन 2019-20 व सन 2020-21 या सत्रातील महाडिबीटी प्रणालीवर नोंदणीकृती करण्यात आलेल्या अर्जापैकी जे अर्ज त्रृटी पुर्ततेकरीता विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत करण्यात आले आहे, असे अर्ज तात्काळ आवश्यक कागदपत्रांची पुर्तता व अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्या लॉगीनला 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत पाठविण्यात यावे. अन्यथा सदर Send Back to Applicant करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत प्राप्त न झाल्यास महाडिबीटी प्रणालीवर कालबाहय करण्यात येतील. तरी जिल्हयातील सर्व प्राचार्यानी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वरील योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवाहन करावे.

जिल्हयातील सर्व प्राचार्यांनी आपल्या स्तरावरुन सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास अवगत करुन तसेच महाडिबीटी पोर्टल https://dbtworkflow.mahadbtmahait.gov.in या पडताळणी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृती/ शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रिशीप) योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करुन पात्र विद्यार्थी सहायक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसुल केल्यास संबंधित महाविद्यालय शासन निर्णयानुसार कारवाईस पात्र राहील. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त, मारोती वाठ यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.