Header Ads

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारंजा येथे तेजस्वीनी आर्मी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ - Tejaswini Army Training Center Launched



स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारंजा येथे तेजस्वीनी आर्मी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम

Tejaswini Army Training Center Launched

कारंजा  दि. २३ - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ व ट्रेडिशनल एंड स्पोर्टस शोतोकॉन कराटे-डू इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथील लोकसंचालित साधन केंद्रात २३ सप्टेंबर रोजी तेजस्वीनी आर्मी (सेल्फ डिफेन्स) Tejaswini Army Training Center Launched कराटे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन तहसीलदार धीरज मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, कारंजाच्या सहायक पोलीस निरीक्षक नम्रता जाधव, ‘माविम’च्या कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके, अल्पसंख्याक लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष छाया मोटघरे, कराटे प्रशिक्षक सुधाकर दामगीर, अजित घुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

तहसीलदार श्री. मांजरे म्हणाले, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला असून ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.

सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती जाधव यांनी ‘माविम’मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

श्री. नागपुरे म्हणाले, महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी बचत गट संकल्पनेवर आधारित कार्यानितीचा अवलंब करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आर्थिक, सामाजिक व स्वसंरक्षण यादृष्टीने आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत ‘तेजस्वीनी आर्मी’ उपक्रमाच्या माध्यमातून जुडो कराटे आणि स्वरक्षण विषयक इतर प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक विजय वाहने, लेखापाल, क्षेत्रीय समन्वयक, सहयोगिनी यांनी परिश्रम केले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.