Header Ads

वाशिम दि १५-०९-२०२१ : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त - Noise pollution control authority appointed in Washim district



वाशिम जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त

कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी यांना द्यावी - वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी 

वाशिम (www.jantaparishad.com) दि. १५ - जिल्ह्यात श्री गणेशोत्सव दरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी यांना द्यावी, असे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कळविले आहे.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२५४५, भ्रमणध्वनी क्र. ९९२३०४३४२२), वाशिम शहर पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर, (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२१००, भ्रमणध्वनी क्र. ९४२३६०६२४३), वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. झळके (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३४१००, भ्रमणध्वनी क्र. ९९२१५१६८६६), रिसोडचे पोलीस निरीक्षक श्री. नवलकर (दूरध्वनी क्र. ०७२५१-२२२३५६, भ्रमणध्वनी क्र. ९८२३३०८०३०), मालेगावचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७१२५३, भ्रमणध्वनी क्र. ९४२०२४६९६८), शिरपूरचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७४००३, भ्रमणध्वनी क्र. ९८५०२५८२१३), मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०६६२, भ्रमणध्वनी क्र. ९९२३०४३४२२), मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०३३३, भ्रमणध्वनी क्र. ८८०६०७३०९०), अनसिंगच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पोहेकर (दूरध्वनी क्र. ०७२५२-२२६०३४, भ्रमणध्वनी क्र. ९९२३०३२४४७), आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील तायडे (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३५५५८, भ्रमणध्वनी क्र. ८७९३३६६९७५), जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आजिनाथ मोरे (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७२०१६), भ्रमणध्वनी क्र. ८१४९४०७२४५), कारंजाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२००८, भ्रमणध्वनी क्र. ८५५१९६२६२०), कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२१००, भ्रमणध्वनी क्र. ९७६७१०९४४९), कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन धंदर  (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२४००, भ्रमणध्वनी क्र. ९८२३२३६०३४), मानोराचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३३२२९, भ्रमणध्वनी क्र. ९४२३५३१३४३), धनजचे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२३२०३०, भ्रमणध्वनी क्र. ८५५१९६२६२०) या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण (भ्रमणध्वनी क्र. ७७०९९७५९०६, दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२७५५, ई-मेल आयडी : readeraddspwashim@gmail.com, addlsp.wsm@mahapolice.gov.in) असून गृह शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक डी. सी. खंडेराव (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३१३५५, भ्रमणध्वनी क्र. ८३७८९१०४४४, ई-मेल आयडी : dysphome.wsm@mahapolice.gov.in) हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी (दूरध्वनी क्र. ०७२१-२५६३५९३, फॅक्स क्र. ०७२१-२५६३५९७, ई-मेल आयडी : roamravati@mpcb.gov.in) हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस अथवा sp.washim@mahapolice.gov.in या ई-मेलवर संदेश पाठवू शकतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.