Header Ads

जिल्ह्यातील युवक-युवतींनी जिल्हा कौशल्य स्पर्धा-२०२१ सहभागी व्हावे jilha kaushalya spardha 2021

Maharashtra rajya kaoushal vikas spardha 2021


जिल्ह्यातील युवक-युवतींनी जिल्हा कौशल्य स्पर्धा-२०२१ सहभागी व्हावे

वाशिम, दि. १३ (जिमाका) : सन २०२१-२२ मध्ये आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने ४७ क्षेत्रांशी संबंधित जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा आयोजनाबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (एनएसडीसी) मार्फत निर्गमित मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन १७ ते १८ ऑगस्ट २० या दोन दिवशीय कालावधीत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा २०२१’ च्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम मंच उपलब्ध करून देत आहे. या या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी होवून कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform या लिंकवर अभ्यासक्रमांची यादी पहावी व कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदणीसाठी सदर लिंकवर क्लिक करून आपली परिपूर्ण माहिती १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत भरावी. अधिक माहितीसाठी ०७२५२-२३१४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.