Header Ads

100% ई पीक पाहणी पूर्ण करणारे कारंजा तालुक्यातील जयपुर ठरले वाशिम जिल्ह्यातील पहिले गाव - e-pik pahani jaypur first in washim district

 

100% ई पीक पाहणी पूर्ण करणारे कारंजा तालुक्यातील जयपुर ठरले वाशिम जिल्ह्यातील पहिले गाव

   कारंजा दि. २६ - महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईल मधून भरता यावा याकरता ही ई पीक  पाहणी प्रकल्प सुरू केला असून त्यानुसार त्यानुसार जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, सुनील विंचनकर उपजिल्हाधिकारी महसूल, राहुल जाधव उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनात कारंजा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल , तलाठी यांची आढावा सभा 22 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती . त्यावेळी तालुक्यातून प्रथम  100 टक्के पीक पाहणी करणाऱ्या  5 गावांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल अशा प्रकारच्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती .


    त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन कारंजा तालुक्यातील जयपूर गावचे कार्यतत्पर सरपंच विजय पाटील काळे यांचे नेतृत्वात, पंचायत समिती सदस्य वैशाली पाटील काळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील युवक , गावातील तलाठी ,कृषी सेवक, ग्रामसेवक ,संगणक ऑपरेटर, कोतवाल यांनी उत्तम नियोजन करून 28 ऑगस्ट रोजी 100 टक्के पिक पाहणी पूर्ण केली.कारंजा तालुक्यात व पर्यायाने वाशिम जिल्ह्यात एकाच गावातील 100 टक्के खातेदारांची ई पीक पाहणी पूर्ण  करणारे जयपुर हे प्रथम गाव ठरले आहे.जयपूर गावाने आपल्या गावाचे नाव सार्थ ठरवत जिल्ह्यात ई पीक पाहणीचा जयपुर पॅटर्न विकसित केला आहे .

      ई पीक पाहणी करता सकाळी सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये गावातील एकूण 207 खातेदार यांच्या पिक पाहणीसाठी 15 टीम तयार करण्यात आल्या .प्रत्येक टीम  गावातील दोन युवक व एक सहाय्यक नेमून त्यांना ई पीक पाहणी करावयाच्या खातेदारांची यादी व गाव नकाशा उपलब्ध करून देण्यात आला. तसेच संबंधित भागातील शेतकरी यांना शेतामध्ये हजर राहण्यासाठी सूचित करण्यात आले.

ई पिक पाहणी यशस्वी करण्यासाठी गावातील युवक , ग्रामपंचायत सदस्य,  ,तलाठी नेहा खंडारे ,ऑपरेटर नितीन डाखोरे, तुषार जाधव ,मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद, अनपट ,मनोहर ,कृषी विभागाचे  अधिकारी कृषी पर्यवेक्षक सुनिल शिंदे, गुणवंत ढोकने,नरेंद्र फुके, मंगेश सोलंके, प्रविण जटाळे , ग्रामसेवक शिंदे,जयपुर येथिल 32 युवा स्वयंसेवक, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय N. S. S. 6 विद्यार्थी, पंचायत समिती 3 संगणक ऑपरेटर एकूण 58 व्यक्तींनी  परिश्रम घेतले.

ई पीक पाहणी यशस्वी करण्यासाठी प्रारिश्रम घेतल्याबद्दल सर्वांना प्रमाणपत्र देऊन तहसिलदार धीरज मांजरे,तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके ,सरपंच विजय काळे ,शेतकरी नेते गजानन  अमदाबादकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

    तालुक्यातील इतर गावे देखील जयपुर पासून प्रेरणा घेऊन या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून ई पीक पेरा स्वतः भरतील आसा आशावाद तहसीलदार धीरज मांजरे यांनी व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.