Header Ads

सीआरपीएफ जवान निशांत काकडे हे वाशीम जिल्ह्याचे भुषण: आ.अ‍ॅड. सरनाईक Nishant Kakde pride of washim district



सीआरपीएफ जवान निशांत काकडे हे वाशीम जिल्ह्याचे भुषण: आ.अ‍ॅड. सरनाईक

राष्ट्रपती विरता पदक प्राप्त काकडेंचा सत्कार

वाशीम दि. ३१ - कश्मिरमधील बारामुल्ला येथे एका चकमकीत दोन आतंवाद्यांचा खात्मा करणारे वाशीम येथील रहिवाशी सीआरपीएफ जवान निशांत काकडे यांचा त्यांच्या निवासस्थानी जावून शिक्षक मतदारसंघाचे आ. अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी शनिवार 31 जुलै रोजी शाल, श्रीफळ व बुके देवून भावपूर्ण सत्कार केला. यावेळी आ. सरनाईक यांनी त्यांचे मोठे बंधु हभप नामदेवराव काकडे महाराज यांचाही शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य अरूणराव सरनाईक, तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रा. दादाराव देशमुख, सरनाईककाका, वडील अरूणराव काकडे आदिंची उपस्थिती होती. 
यावेळी काकडे यांनी काश्मिरमध्ये वेगवेगळया मोहिमेत सहभाग घेतल्याची माहिती देवून दोन आतंकवाद्यांचा खात्मा कसा प्रकारे केला याची विस्तृत माहिती दिली. यावेळी आ. अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी निशांत काकडे हे वाशीम जिल्हयाचे भुषण आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता आतंवाद्यांचा खात्मा करून त्यांनी आपल्या देशभक्तीचा परिचय दिला आहे. काकडे परिवारावर माऊलीची कृपा असल्याचे सांगत प्रशासन व शासनाच्या वतीने काकडे यांना सर्वोतरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्यांच्या शौर्याचा सन्मान म्हणून त्यांना जमीन मिळण्याकरीता आपण पाठपुरावा करू असे सुध्दा त्यांनी सांगीतले.  

No comments

Powered by Blogger.