Header Ads

ब्रेकिंग न्यूज़ : राज्यातील जि.प. आणि पं.स. पोटनिवडणुक आहे त्या स्थितीत स्थगित - maharashtra zp and ps elections postponed



ब्रेकिंग न्यूज़ : राज्यातील जि.प. आणि पं.स. पोटनिवडणुक आहे त्या स्थितीत स्थगित 

    मुंबई दि ०९ जुलाई २०२१ - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या पोटनिवडणुका आहे त्यास्थितीत स्थगित ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने आज दिला आहे. राज्यातील कोरोना ची स्थिति आणि निर्बंध यांचे पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यु.पि.एस. मदान यांनी घोषित केले.

    राज्यात धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपुर या  ५ जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि संलग्र ३३ पंचायत समित्यांची पोटनिवडणुक घोषित होती.  निवडणूक अर्ज भरने, त्रुटि काढणे ह्या प्रक्रिया सम्पूर्ण झाल्यात. नाव मागे घेणे नंतर केवल १९ जुलाई रोजी मतदान ह्या प्रकिया बाकी आहेत. मात्र पोटनिवडून प्रक्रिया ज्या स्थितीत आज आहेत त्याच जागेवर लांबनिवर टाकण्यात येत आहेत अशी घोषणा करण्यात आली आहे.  

    कोरोना बाबतची स्थिति सुधारल्यावर या पोटनिवडणुकीचे उर्वरित टप्पे हे पार पाडले जाणार आहे असे ही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.  

No comments

Powered by Blogger.