Header Ads

केंद्रीय आयकर विभागाच्या खेळाडू भरतीसाठी प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर करावेत Certificate verification proposal should be submitted for recruitment of players of Central Income Tax Department



केंद्रीय आयकर विभागाच्या खेळाडू भरतीसाठी प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर करावेत

वाशिम, दि. २० (जिमाका) : नुकतीच आयकर विभागाची खेळाडू कोट्यातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीकरिता राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये सहभागी व पदक प्राप्त खेळाडूंना उपसंचालक (मुख्यालय), क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रमाणपत्र प्रमाणित करून घ्यावयाचे आहे. यासाठी अशा खेळाडूंनी आपले फक्त शालेय राष्ट्रीय प्रमाणपत्र (प्राविण्य अथवा सहभाग) व विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर खेळाडूचा ई-मेल, तसेच प्रमाणपत्राची छायांकित प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे १० ऑगस्ट २०२१ पर्यंत सादर करावी.

संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाद्वारे प्रमाणपत्र पडताळणी करून फॉर्म नं. ४ पाठविण्यात येईल. त्यानंतर संचालनायामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिमला निर्गमित केला जाईल. तसेच एक प्रत अर्जासोबत दिलेल्या ई-मेलवर सुद्धा पाठविण्यात येईल. जेणेकरून ई-मेलद्वारे प्राप्त प्रत प्रिंट करून अर्ज भरतांना अपलोड करणे शक्य होईल. प्रत्येक खेळाडूला पुणे येथे जावे लागणार नाही. तसेच दरम्यानच्या काळात मूळ स्वाक्षरीचे फॉर्म क्र. ४ संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास प्राप्त होतील. अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.