Header Ads

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ५० प्रशिक्षणार्थींच्या जागा 50 trainees post for junior clerk in akola district central bank



रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ५० प्रशिक्षणार्थींच्या जागा

वाशिम, दि. १९ (जिमाका) : दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक मर्या. अकोला या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ५० प्रशिक्षणार्थींच्या जागा रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम अंतर्गत भरावयाच्या आहेत. तरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदाच्या प्रशिक्षणासाठी किमान २० ते कमाल ३० वर्षे वयोगटातील बी.एससी., बी. कॉम., बी. ई. पदवी आणि एमएस-सीआयटी केलेल्या विद्यार्थ्यांनी www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलचा वापर करून ‘जॉबसिकर लॉगीन’मध्ये आपला युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून सहभाग नोंदवावा. तसेच २१ जुलै २०२१ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत आदर्श विद्यालय, सहकार महर्षि डॉ. अण्णासाहेब कोरपे नगर, आदर्श कॉलनी, अकोला येथे आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती प्रमाणित करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणार्थींना ९ हजार रुपये मानधन दिले जाईल. हे प्रशिक्षण फक्त ६ महिने ओजेटी तत्वावर राहील. यानंतर कोणताही दावा सदर पदाकरिता लागू राहणार नाही. उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा खर्च देण्यात येणार नसून त्यांना स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याविषयी काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.