Header Ads

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना - Loan scheme for higher education of minority students

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना

वाशिम, दि. 25 (जिमाका) : मुस्लीम, बौध्द, शीख, पारसी, ख्रिश्चन व जैन या अल्पसंख्यांक समुदायातील गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळांतर्गत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आदी उच्च शिक्षणासाठी या योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज व अधिक माहितीसाठी www.mals.maharashtra.gov.in या संकेस्थळाचा वापर करावा. जिल्हयातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वाशिम येथील नवीन आय.यु.डी.पी. कॉलनीतील आय.टी.आय. कॉलेजसमोरील मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.  

No comments

Powered by Blogger.