Vardhapan Din

Vardhapan Din

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभ घेण्याचे आवाहन - Pradhan Mantri Matsya Sampada Yojana

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभ घेण्याचे आवाहन
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana

    वाशिम, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना Pradhan Mantri Matsya Sampada Yojana सन २०२०-२१  ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे, कृषि क्षेत्राच्या सकल मूल्यात वाढ करणे आणि निर्यातीतील योगदान वाढविणे हा प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा उद्देश आहे. केंद्र शासनामार्फत मत्स्य व्यवसाय हा पूरक व अग्रक्रमित व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. याद्वारे भूजलाशयीन क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत पारंपारिक मच्छिमारांचे, मत्स्य व्यावसायिकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेची अधिक माहिती http://dof.gov.in/pmmsy या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत विविध घटक योजनांसाठी सन २०२१-२२ करिता इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे. वाशिम जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), पद्मश्याम इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर, सिव्हील लाईन्स, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या acf.washim@rediffmail.com किंवा pmmsy.washim@gmail.com ई-मेलवर अर्ज पाठवावेत. सदर योजनेची माहिती घेण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आ. वि. जाधव (भ्रमणध्वनी क्र. ८४५९५८११३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) विभागाचे सहाय्यक आयुक्त म. वि. जयस्वाल यांनी केले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells