Header Ads

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांसाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम - Mukyamantri Mahaarogya kaushal vikas prashikshan karyakram

 

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांसाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन

Mukyamantri Mahaarogya kaushal vikas prashikshan karyakram

    वाशिम, दि. २८ (जिमाका) : आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’  (Mukyamantri Mahaarogya kaushal vikas prashikshan karyakramराबविण्यात येणार असून हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक युवक, युवतींनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन  केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

    कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडीकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ वैद्यकीय क्षेत्राशी संलग्नित प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळून ते खाजगी अथवा सरकारी इस्पितळात काम करण्यासाठी पात्र होऊ शकतात. 

    तरी इच्छुकांनी ८६६८२५६५०० अथवा ९६६५५२५६५१ यापैकी एका व्हाटसअप क्रमांकवर संदेश पाठवून गुगल फॉर्मची लिंक प्राप्त करून घेवून सदर ऑनलाईन फॉर्म भरावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.