Header Ads

जास्त दराने खतांची विक्री केल्यास कारवाई - कृषी विभागाचा इशारा : Action against sale of fertilizers at high rates - Warning of Agriculture Department

जास्त दराने खतांची विक्री केल्यास कारवाई - कृषी विभागाचा इशारा

  • खत खरेदीची ई-पॉस मशीनची पावती घ्यावी.
  • अडचणी व तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
  • विविध कंपन्यामध्ये उत्पादीत होणाऱ्या रायानिक खताच्या 50 किलो बॅगच्या किमती खालील दिल्याप्रमाणे 

वाशिम, दि. 28 (जिमाका) : जिल्हयातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांची किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा खत परवाना अधिकारी वाशिम यांनी दिला आहे.

पावसाळयाची चाहुल लागताच जिल्हयातील शेतकऱ्यांची खरीप हंगामात रासायनिक खते व बियाण्यांच्या खरेदीची लगबग सुरु झाली आहे. युरीया वगळता इतर रासायनिक खताच्या किमती जरी वाढलेल्या असल्या तरी केंद्र शासनाने रासायनिक खतावरचे अनुदान वाढविल्यामुळे विविध कंपन्यामध्ये उत्पादीत होणाऱ्या रायानिक खताच्या 50 किलो बॅगच्या किमती जाहिर केल्या आहे. त्या पुढील प्रमाणे डी.ए.पी खत- इफको कंपनी- 1200 रुपये, जीएसएफसी- 1200 रुपये, जयकिसान झुवारी ॲग्रो- 1200 रुपये, कोरोमंडल- 1200 रुपये, महाधन- 1200 रुपये, कृभको- 1200 रुपये, स्मार्ट केम- 1200 रुपये आणि आयपीएल-1200 रुपये. 10:26:26 खत- इफको- 1175 रुपये, जीएसएफसी- 1175 रुपये, जयकिसान झुवारी ॲग्रो- 1375 रुपये, महाधन- 1390 रुपये, कृभको- 1300 रुपये, स्मार्ट केम- 1390 रुपये. 12:32:16 खत - इफको- 1185 रुपये, जीएसएफसी- 1185 रुपये, जयकिसान झुवारी ॲग्रो- 1310 रुपये, महाधन- 1370 रुपये, कृभको- 1310 रुपये, स्मार्ट केम- 1370 रुपये. 20:20:0:13 खत- इफको- 975 रुपये, जीएसएफसी- 975 रुपये, जयकिसान झुवारी ॲग्रो- 1090 रुपये, कोरोमंडल- 1050 रुपये, आरसीएफ- 975 रुपये, महाधन- 1150 रुपये, कृभको-1050 रुपये, स्मार्ट केम- 1150 रुपये, आयपीएल-1050 रुपये. 19:19:19 खत- जयकिसान झुवारी ॲग्रो- 1575 रुपये, 28:28:00 खत- जयकिसान झुवारी ॲग्रो- 1475 रुपये, कोरोमंडल- 1450 रुपये, 14:35:14 खत- जयकिसान झुवारी ॲग्रो- 1365 रुपये, कोरोमंडल- 1400 रुपये, 24:24:0:8 खत- कोरोमंडल- 1500 रुपये, महाधन- 1450 रुपये, 15:15:15:09 खत- कोरोमंडल- 1150 रुपये, आयपीएल- 1100रुपये, 16:20:0:13 खते- कोरोमंडल- 1000 रुपये, 15:15:15 खते- आरसीएफ 1060 रुपये, 14:28:00 खते- महाधन- 1280 रुपये, स्मार्ट केम- 1280 रुपये, 16:16:16 खते- महाधन- 1125 रुपये, स्मार्ट केम- 1125 रुपये, आयपीएल- 1125 रुपये आणि 14:35:14 खते- कोरोमंडल- 1400 रुपये असे रासायनिक खतांचे सुधारीत दर 20 मे 2021 पासून निश्चित केले आहे.

तरी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी करतांना खताच्या किमती कंपनी निहाय व ग्रेडनिहाय जाहिर केलेल्या दराप्रमाणेच खरेदी करावी. रासायनिक खत विक्रेत्यांकडे असलेल्या ई-पॉस मशीनची खत खरेदी केल्याची पावती विक्रेत्याकडून घ्यावी. त्यावरुन रासायनिक खताच्या किमतीची पडताळणी करता येईल.

खताची गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून रितसर पावती घेवून खरेदी करावी. खताच्या खरेदीची पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी खताची पाकीटे व गोणी सिलबंद/मोहोरबंद असल्याची खात्री करावी. कृषी निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 यावर संपर्क साधावा. तसेच नजीकच्या कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी किंवा संनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी व्हि.एस. बंडगर यांनी कळविले आहे.

कंपनीने जाहिर केलेल्या ग्रेड निहाय खताच्या किमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही कृषी सेवा केंद्र संचालकाने विक्री करु नये. अन्यथा त्यांचा खत विक्री परवाना खत नियंत्रण आदेशान्वये रद्द केला जाईल. असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिला आहे. 

No comments

Powered by Blogger.