Vardhapan Din

Vardhapan Din

कारंजा लाड दि. 5 - जास्त वऱ्हाडी जमवल्या प्रकरणी कारंजा येथील सालासार मंगल कार्यालयासह लग्न मालकास ३५ हजार दंड marriage hall owner and marriage party fined 35 thousand


जास्त वऱ्हाडी जमवल्या प्रकरणी कारंजा येथील सालासार मंगल कार्यालयासह लग्न मालकास 35 हजार दंड

मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांची कार्यवाही

कारंजा लाड दि. 5 - कोविड 19 ची प्रभावी अमलबजावणी कारंजा नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असून संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारंजा शहरातील एका मंगल कार्यालत 25 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी आढळून आल्यामुळे नगर परिषद कोरोना पथकाने मंगलकार्यालयास  25 हजार व लग्न मालकास 10 हजार रुपये असा एकूण 35 हजार रुपये दंड आकारण्यात आल्याची कार्यवाही दि. 5 मे रोजी करण्यात आली.


     सविस्तर असे की, कारंजा येथील गुलाबराव आमटे यांच्या कडील विवाह सुरू असल्याच्या माहिती वरून कोरोना प्रतिबंधक पथक यांनी धाड टाकली असता त्या ठिकाणी 25 पेक्षा विना मास वर्हाडी आढळून आले. त्यामुळे त्यांना 10 हजार रुपये दंड व सालासार मंगल कार्यालयाचे मालक चाडक यांना 25 हजार असा एकूण 35 हजार रुपये दंड आकारण्यात आला.  त्यामुळे शहरातील कोणाकडे ही लग्न सोहळा असल्यास 25 पेक्षा वऱ्हाडी मंडळी आढळून आल्यास कार्यवाही करण्यात येईल असे मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी सांगितले.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells