Vardhapan Din

Vardhapan Din

वाशिम दि.१८ एप्रिल - कोरोना बाधितांसाठी खाटा, प्राणवायूची कमतरता राहणार नाही - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Oxygen generation plant soon

कोरोना बाधितांसाठी खाटा, प्राणवायूची कमतरता राहणार नाही - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

 ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ लवकरच कार्यान्वित होणार

वाशिम, दि. १८ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना बाधितांवर उपचारासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून या सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची संख्या वाढविण्याची कार्यवाही दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ सुद्धा लवकरच कार्यान्वित होत असून जिल्ह्यात कोरोना बाधितांवर उपचारासाठी पुरेशा खाटा उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १८ एप्रिल रोजी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर कधी करायचा, याविषयी राज्यस्तरीय टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना सर्व खाजगी डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. रेमडेसिवीरच्या वापराबाबत प्रसारमाध्यमांनी सुद्धा जनजागृती करून या इंजेक्शनच्या वापराविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांवर अशा उपचाराची गरज असलेल्या रुग्णांनाच भरती करावे. तसेच रुग्णालयात खाटा शिल्लक असल्यास रुग्णांना परत न पाठविता त्यांच्यावर उपचार सुरु करण्याबाबत खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.

प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच जिल्हा कोविड रुग्णालयात आणखी ७५ खाटा उपलब्ध होणार आहेत. तसेच याठिकाणी ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’चे काम सुद्धा अंतिम टप्प्यात असून याद्वारे दैनंदिन २०० जम्बो सिलेंडर भरतील इतका प्राणवायू तयार होणार आहे. त्यामुळे प्राणवायू सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच जिल्हा कोविड रुग्णालयासाठी ७५ ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ आणि २५ बायपॅप मशीनची खरेदी करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे. गतवर्षी प्रमाणे आताही अशा लोकांची वाहने जप्त करण्यात येणार असून संचारबंदी असेपर्यंत ही वाहने पोलीस ठाण्यात ठेवण्यात येतील. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुद्धा करण्यात येणार आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, जिल्ह्यात सध्या ८ कोविड केअर सेंटरमध्ये ८९३ सर्वसाधारण खाटा उपलब्ध आहेत. तसेच शासकीय व खाजगी कोविड हेल्थ सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये प्राणवायूची सुविधा असलेल्या ५२६ खाटा, ‘आयसीयु’च्या २१४ खाटा उपलब्ध असून ७७ व्हेंटीलेटर्स सुविधा उपलब्ध आहेत. यापैकी ऑक्सिजन बेडवर २८५ व व्हेंटीलेटर्सवर २१ रुग्ण आणि १६ रुग्ण आयसीयुमध्ये भरती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या काही दिवसात अजून काही खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचारासाठी मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells