Header Ads

दि ०४-०३-२०२१ वाशिम : कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर समितीची स्थापना - Establishment of a committee at the taluka level for the management of Covid Care Center

कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर समितीची स्थापना

Establishment of a committee at the taluka level for the management of Covid Care Center

रुग्णांना पाणी, वीज, स्वच्छता, भोजन व्यवस्था आदी पायाभूत सुविधा वर देणार लक्ष्य 

वाशिम, दि. ०४ : जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा येथे एकूण ६ कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आली आहेत. सदर कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांना पाणी, वीज, स्वच्छता, भोजन व्यवस्था आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी ३ मार्च रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार व्यवस्थापन समितीच्या सर्व कामावर तहसीलदार यांचे नियंत्रण राहील. कोविड केअर सेंटरमध्ये पाणी पुरवठा, पाण्याचे नळ याबाबतची सर्व कामे, विद्युत संबंधित अडचणींचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्यावर राहील. जेवण, चहा, नास्ता, पिण्याचे पाणी याची जबाबदारी संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची राहील.

आरोग्य तपासणी, जे रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत, त्यांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या आरोग्याची स्थिती अवगत करण्यासाठी फोन करण्याकरिता आरोग्य सेविकेची नियुक्ती करण्याची जबाबदारी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांची राहील. कोविड केअर सेंटरची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, परिसर स्वच्छता व इतर अनुषंगिक कामे याविषयी आवश्यक कार्यवाही संबंधित नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे.

No comments

Powered by Blogger.