Header Ads

दि ०४-०३-२०२१ वाशिम : श्री गजानन महाराज प्रकटदिन घरगुती पध्दतीने साजरा करा - जिल्हाधिकारी यांचे आदेश Celebrate Shri Gajanan Maharaj Pragat Din at home

श्री गजानन महाराज प्रकटदिन घरगुती पध्दतीने साजरा करा
जेवणाचे कार्यक्रम, मिरवणूक, गर्दी होणाऱ्या कार्यक्रमास मनाई

वाशिम, दि. ०४ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात ८ मार्च २०२१ रोजीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ५ मार्च २०२१ रोजी श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त जेवणाचे कार्यक्रम आयोजित न करता वैयक्तिक स्वरूपात घरगुती पध्दतीने प्रकटदिन साजरा करावा, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ४ मार्च रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त जेवणाचे कार्यक्रम, मिरवणुका तसेच गर्दी होणारे इतर कोणत्याही प्रकारची कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.