Header Ads

दि.17 - एप्रिल महिन्यातील धान्य वितरणात बदल


 एप्रिल महिन्यातील धान्य वितरणात बदल

वाशिम, दि. १७ : शासन निर्देशानुसार एप्रिल २०२१ महिन्याच्या धान्य वितरणात वदल करण्यात आला आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या कार्डधारकांना गव्हाचे प्रमाण ४० टक्के कमी करून त्याठिकाणी ३० टक्के मका व १० टक्के ज्वारीचे वितरण करण्यात येईल. मका व ज्वारीचा विक्री दर प्रति किलो १ रुपया आहे. तसेच गहू विक्रीचा दर प्रति किलो २ रुपये, तांदूळ प्रति किलो ३ रुपये याप्रमाणे राहील. शेतकरी लाभार्थ्यांच्या वितरणात कोणताही बदल झालेला नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांनी कळविले आहे.

बदललेल्या धान्य वितरणानुसार अंत्योदय अन्न योजना अंतर्गत प्रति कार्ड ९ किलो गहू, ४.५ किलो मका, १.५ किलो ज्वारी, ५० किलो तांदूळ व १ किलो साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत प्रति व्यक्ती १.८ किलो गहू, ९०० ग्रॅम मका, ३०० ग्रॅम ज्वारी, २ किलो तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी लाभार्थी योजना अंतर्गत प्रति व्यक्ती ४ किलो गहू व १ किलो तांदूळ वितरीत केले जाणार आहेत.

No comments

Powered by Blogger.