Header Ads

२४ फेब्रु. - आज वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट ३१८ कोरोना बाधित : देगाव निवासी शाळेतील १९० विद्यार्थ्यांचा समावेश - 24 FEB - corona blast in washim district

 

24 FEB - Washim District Corona News

२४ फेब्रु. - आज वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट

३१८ कोरोना बाधित : देगाव निवासी शाळेतील १९० विद्यार्थ्यांचा आज समावेश 
शाळेतील एकूण २२९ विद्यार्थी कोरोना पॉजिटिव 

    वाशिम (जनता परिषद) दि.२४ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Blast) कोरोना  चा ब्लास्ट झाला असून तब्बल ३१८  रुग्णांची कोरोना बाधित म्हणून नोंद झाली. यामध्ये देगाव निवासी शाळेतील १९० विद्यार्थांचा आजचे आकड़ेवारित समावेश आहे. त्यामुळे देगाव निवासी शाळेत गत दोन दिवसात आजचे १९० विद्यार्थी सह एकूण २२९ विद्यार्थी हे कोरोना बाधित आले आहेत. 

            जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ८२४०  वर पोहोचली आहे. तर आज एका कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद ही करण्यात आली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील २, छत्रपती शिवाजी नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ३, देवपेठ येथील ३, आययुडीपी येथील ४, काटीवेस येथील १, लाखाळा येथील १, माधवनगर येथील १, नंदीपेठ येथील १, नवीन आययुडीपी येथील १, शुक्रवार पेठ येथील २, टिळक चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अडोळी येथील १, अनसिंग येथील २, गुंज येथील १, जुमडा येथील १, केकतउमरा येथील १, कोंडाळा येथील ४, मालेगाव शहरातील २, जऊळका येथील १, बोरगाव येथील १, गिव्हा कुटे येथील १, शेलू फाटा येथील १, मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील १, पाळोदी येथील १, पोहरादेवी येथील १, साखरडोह येथील १, वाईगौळ येथील १, कारंजा शहरातील अकोला अर्बन बँक परिसरातील ३, भगतसिंग चौक परिसरातील १, भारतीपुरा येथील ३, दत्त कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, जागृतीनगर येथील १, बाबारे कॉलनी येथील १, गणपती नगर येथील २, जिरापुरे कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, माळी कॉलनी येथील १, निवारा कॉलनी येथील २, प्रगतीनगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, गवळीपुरा येथील १, वनदेवी नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, भामदेवी येथील १, दापुरा येथील १, धनज येथील ७, हिवरा लाहे येथील १, कामरगाव येथील ४, कसगाव येथील १, पारवा कोहर येथील १, पिंपळगाव येथील १, आखतवाडा पीएनसी कॅम्प येथील २, रहाटी येथील १, शहा येथील १, सिरसोळी येथील १, वाई येथील १, धामणी खडी येथील १, जांब येथील १, पोहा येथील १, यावर्डी येथील १, रिसोड शहरातील १, दापुरी येथील १, मसलापेन येथील १, मोठेगाव येथील १ व्यक्ती तसेच देगाव येथील निवासी शाळेतील १९० विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. एका कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तसेच ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ८२४०   
  • ऍक्टिव्ह – ८९०   
  • डिस्चार्ज – ७१९२   
  • मृत्यू – १५७ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.