Header Ads

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतली कोरोनाची लस

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतली कोरोनाची लस

कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी लस घेण्याचे आवाहन

वाशिम, दि. २३ (जिमाका) : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात १६ जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत आज, २३ जानेवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी, तसेच काल, २२ जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनीही लस घेतली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मडावी, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. लक्ष्मीकांत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्रांवर शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना पहिल्या टप्प्यात लस दिली जात असून. शुक्रवारपर्यंत सुमारे ९०० जणांनी लस घेतली.

लस घेतल्यानंतर डॉ. राठोड म्हणाले, कोरोनाची लस पुर्णतः सुरक्षित आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मला रक्तदाब असूनही मी आज लस घेतली आहे. मला कसलाही त्रास जाणवला नाही. कोरोनापासून बचावासाठी लस घेणे गरजेचे असून सर्वांनी लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. आहेर म्हणाले की, कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव होण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मी सुद्धा लस घेतली. लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. यापूर्वी लस घेतलेल्या काही जणांना काही तासानंतर सौम्य ताप, अंगदुखी, मळमळणे यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी डॉक्टर व त्यांच्याकडील कर्मचारी यांनी अवश्य लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments

Powered by Blogger.