Header Ads

13 Jan - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज ११ कोरोना बाधित

 

    

  13 Jan - Washim District Corona News

१३ जाने. - वाशिम जिल्ह्यात आज ११ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.१३ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ११ रुग्णांची नोंद झाली तर ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६८१५  वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पाटणी चौक येथील १, सिव्हील लाईन्स परिसरातील २, आर. ए. कॉलेज जवळील १, रिसोड शहरातील २, मालेगाव तालुक्यातील पिंपळा येथील १, मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १, इतर ठिकाणच्या २, गोगरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर झालेल्या एका मृत्यूची नोंद झाली असून ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६८१५
  • ऍक्टिव्ह – ११०
  • डिस्चार्ज – ६५५२
  • मृत्यू – १५२

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.